सूचना
नोंदणी सुरू आहे — 96 कुळी मराठा विवाह परिचय मंडळ 2025-26
पुढील परिचय मेळावा लवकरच — तारीख जाहीर होणार
सदस्यत्व शुल्क : सभासद ₹१,००० • गैर-सभासद ₹१,५००
कार्यालय : चिंचपोकळी, मुंबई ४०० ०१२ • kmsmumbai1970@gmail.com
आमच्याबद्दल

क्षत्रिय मराठा समाज, मुंबई

96 कुळी मराठा समाजाचा सर्वांगीण विकास — 1974 पासून

घटना पत्रक

क्षत्रिय मराठा समाज, मुंबई (नोंदणीकृत)
क्रमांक नोंदणी : मुंबई/८४/१९८७ जी.बी.बी.एस.डी. सा. वि. अंक. क्र. : फ/११८४९, मुंबई

१) संस्थेचे नांव

"क्षत्रिय मराठा समाज" असे राहील.

२) संस्थेच्या कचेरीचा पत्ता

१/१०९, सहकार सदन, पहिला मजला, दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी, मुंबई - ४०० ०१२.

३) संस्थेचे उद्देश
  • अ) महाराष्ट्रात ठिकठिकाणी विखुरलेल्या सर्व समाज बांधवांना संघटित करून त्या समाजाची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नती करून परस्पर स्नेहभाव निर्माण करणे.
  • ब) सर्व बांधवांची शारीरिक, सांस्कृतिक, बौद्धिक उन्नती साधने आणि त्याकरिता शिक्षणाचा प्रसार करणे. राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करून समाजाचा दर्जा वाढविणे.
  • क) समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना विनाअट अगर परतफेडीच्या तत्वावर शिष्यवृत्या देणे किंवा पुस्तकरूपाने वा आर्थिक सहाय्य करणे.
  • ड) निरनिराळे शैक्षणिक वर्ग चालविणे, वाचनालये चालविणे, शाळा काढणे व त्याद्वारे समाजातील निरक्षरता दूर करून समाज साक्षर करणे.
  • इ) सर्व बांधवांचे आरोग्य सुधारण्यासाठी शारीरिक शिक्षणाचे वर्ग काढणे व चालविणे.
  • ई) सर्व बांधवांनी निराधार, अपंग आणि अनाथ बांधवांस मदत करणे.
  • उ) सर्व बांधवांमध्ये ऐक्य व स्नेहाची भावना निर्माण व्हावी व सर्वजण एका मध्यवर्ती जागी सुसंघटित व्हावेत यासाठी सोईस्कर ठिकाणी सभागृह बांधणे व त्याची व्यवस्था पाहणे.
  • ऊ) शक्य झाल्यास सर्व बांधवांना औषधे तसेच आरोग्य विषयक उपकरणे पुरविणे अगर धर्मादाय दवाखाने चालविणे.
  • ए) कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी व सर्व बांधवांच्या जिवीत आणि वित्तरक्षणासाठी शांतीदल व सहाय्य केंद्रे स्थापन करणे.
  • ऐ) सर्व बांधवांमध्ये शिस्त, स्वावलंबीपणा, आत्मविश्वास, साधेपणा, सेवाधर्म, संयम व सहकार्याची भावना इत्यादि गुणांची जोपासना व्हावी म्हणून स्वयंसेवकदल, प्रथमोपचार केंद्र, शिशू संगोपन केंद्र स्थापन करणे, प्रौढ शिक्षण केंद्र उघडणे व अशा रीतीने समाज बांधवांना आदर्श असे भारताचे नागरिक बनविणे आणि "समाजाच्या उद्धारातून देशोद्धार साधने".
  • ओ) वृद्धावस्था, आजारीपणा, दुर्बलता अशा अवस्थेत तसेच मृत्युच्या वेळेस सर्व बांधवांना सहाय्य करणे.
  • औ) संस्थेचा अद्ययावत इतिहास लिहिण्यास सुलभ व्हावे म्हणून जुनी कागदपत्रे तसेच इतर ऐतिहासिक साधने उपलब्ध करून त्याचे संशोधन करणे.
  • अं) उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या समाज बांधवांना समाज रत्न, समाज भूषण, जीवन गौरव यासारख्या पुरस्काराने सन्मानित करणे.

नोंदणी माहिती

आयकर नोंदणी
Income Tax Rsg. No. INS/26158 dt. 21-02-1992
80-G सवलत
No. DIT(E) MC/80G/2374/2009-10
BC Trust Cell/INS 26158
PAN
AAATK3423H
कलम 80-G
Exemption under 80G of I.T. Act 1961
त्वरित माहिती
  • स्थापना : ३ मार्च १९७४, आबिटगाव, चिपळूण
  • रत्नागिरी जिल्ह्यातील ४० गावे — गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, लांजा तालुके
  • 96 कुळी मराठा समाजातील सर्व बंधू-भगिनींसाठी
  • प्रत्येक प्रोफाईल मॅन्युअली सत्यापित
  • kmsmumbai1970@gmail.com
  • kshatriyamarathasamaj.org
संपर्क करा
देणगीसाठी बँक तपशील
  • नाव : Kshatriya Maratha Samaj
  • A/c No. : 032200100065672
  • IFSC : SRCB0000032
  • बँक : Saraswat Bank, Masjid Bunder Branch
चाळीस गावे
1. आबिटगाव 2. आंबेड 3. आजगे 4. बोरथडे 5. चांदीवणे 6. धामापूर (नवसारी) 7. धामापूर (वरचे) 8. फनसट 9. गोळवळी 10. हेदवी 11. कळंबस्ते 12. केरे 13. खरवते 14. किरदाडी 15. कोळंबे 16. कुडली 17. माखजन 18. मावळंगे 19. नरवण 20. निवळी 21. ओमळी 22. ओझरवाडी (चिपळूण) 23. पांगरी 24. रानपाट 25. रावळगाव (शिंदेवाडी) 26. रावळगाव (तांबडवाडी) 27. रावळगाव (सुवर्णवाडी) 28. सांगवे 29. सरंद 30. तळेकांटे 31. तनाळी 32. तुळसणी 33. तुरळ (धोगंडवाडी) 34. तुरळ (राऊळवाडी) 35. तुरंबव 36. उपळे 37. वडेरू 38. वैजी 39. वेरवली 40. विवली + पुणे विभाग